चिपळूण : वहाळमध्ये कृषिकन्यांनी घेतले आंबा कोय कलमाचे प्रात्यक्षिक

चिपळूण : मांडकी पालवण येथील कृषी महाविद्यालयात कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वहाळ येथे शेतकऱ्यांसाठी आंबा कोय कलमांचे प्रात्यक्षिक घेतले. स्वप्नाली हंजगी हिने आंब्याचे कोय कलम कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच सावित्री गुब्याडने कलम करताना कोणती काळजी घ्यावी, कलम तयार करण्यासाठी खुंट व ज्या जातीचे कलम तयार करायचे आहे. त्याची काडी कशी असावी याची माहिती शेतकऱ्यांना दिली.

यावेळी कृषी गटाच्या प्रमुख अनुष्का पाटील, सावित्री गुब्याड, पायल भोसले, सई भोसले, स्वप्नाली हंजगी, समृद्धी पाटील, लावण्या पांढरे, गीतांजली शिंदे, अपूर्वा काटे, गौरी बुरुंगले, ईशा शेख आदी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 30/Jun/2025