चिपळूण : पाथर्डी येथे चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक

रामपूर : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील जय किसान ग्रुपच्या कृषी दूतांनी रामपूर (पाथर्डी) गावात अभिनव कृषी उपक्रम राबवला. कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत, या कृषीदूतांनी अनिल रेडीज यांच्या भातशेतीत चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक केले.

या प्रात्यक्षिकादरम्यान भात लागवडीसाठी गिरीपुष्प पाला आणि युरिया ब्रिकेटचा नियंत्रित वापर करण्यात आला, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो. यासोबतच, भात शेती यांत्रिकीकरणाचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखवण्यात आले, ज्यामुळे वेळ आणि मनुष्यबळाची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 30/Jun/2025