रत्नागिरीत सीए इन्स्टिट्यूटचे चर्चासत्र उत्साहात

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे विविध महत्त्वाच्या विषयांवरील चर्चासत्र उत्साहात झाले. या चर्चासत्रात ‘एमएसएमई आणि एमएसएमई बेनिफिट स्कीम्स, बिझनेस व्हॅल्युएशन, ग्रीन हाऊस गॅसेस अकाउंटिंग आणि सोसायटी रिडेव्हलपमेंट’ या व्यवहारावर लागणाऱ्या वस्तू व सेवाकर कायद्यातील तरतुदी या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे शुक्रवारी (ता. २७) हा कार्यक्रम झाला. शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी वरील विषयांचे महत्त्व सांगितले. प्रथम सत्रात निकिता ओसवाल (पुणे) यांनी एमएसएमईसाठी केंद्र तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या मोबदल्याच्या योजनेवर प्रकाश टाकला.

द्वितीय सत्रात ऋषभ शहा (पुणे) यांनी व्यावसायिक मूल्यांकन कसे करावे आणि त्याचे महत्त्व आणि पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 30/Jun/2025