गणपतीपुळेत दर्शन रांगांपर्यंत समुद्राच्या लाटांचे पाणी

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील आठवडाभर कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. उधाणाच्या लाटा किनाऱ्यावर येत आहेत. तीर्थक्षेत्र गणपतीपुळे किनारीही लाटांचे तांडव पहायला मिळाले. शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या मोठ्या लाटा मंदिराची संरक्षक भिंत ओलांडून आतमध्ये असलेल्या दर्शन रांगांपर्यंत आल्या होत्या. दरवर्षी लाटांचे पाणी संरक्षक भिंतीच्या दरवाज्यापर्यंत येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

कोकण किनारपट्टीवर सध्या उधाणाचा जोर वादल्यामुळे किनाऱ्यावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी गणपतीपुळे येथे समुद्रात मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. समुद्राच्या लाटा वेगाने थेट श्री गणपती मंदिराच्या प्रसाद रांगेपर्यंत पोहोचले, हे दृश्य काहानी कॅमेरामध्ये टिपले होते. याला देवस्थानकडूनही दुजोरो मिळाला आहे.

अंगारकी किंवा संकष्टीवेळी गर्दी असली किंवा दर्शन रांगेचा उपयोग केला जातो सध्या पर्यटकांची गर्दी नसल्याने दर्शन रांगांच्या परिसरात कोणीच नव्हते. एकीकडे समुद्राचे हे रौद्ररूप चिंताजनक असले तरीही, या लाटांचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी समुद्रकिनारी मोठी गर्दी करीत आहेत. लाटांच्या तांडवांचे हे दृश्य अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यातून टिपले आहे.

दरम्यान, समुद्राचे रौद्ररूप पाहता, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जयगड पोलिसांकडून घेतली जात आहे. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात उतरु नये, अशा सूचना देणारे विशेष फलक गणपतीपुळे-मालगुंड पोलिस चौकीमार्फत लावण्यात येणार आहेत. समुद्राला मोठे उधाण आले असल्याने पर्यटकांनी पाण्यात उत्तरण्याचे धाडस करू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जयगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 30/Jun/2025