चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते रत्नागिरी या दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने खड्डे बुजवले की नाही याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सामंत पुढील शनिवारी चिपळूण ते रत्नागिरी मोटारीने प्रवास करणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. अधिवेशनात महामार्गावरील खड्यांचा प्रश्न आता तर त्याची काय उपाययोजना सरकार करत आहे हे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. आरवली से कांटे यादरम्यानच्या रस्त्याचे ८० टक्के काम झाले असून २० टक्के शिल्लक आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो प्रवासी महामार्गाने येतात. त्यांना केवळ यावर्षी त्रास सहन करावा लागेल. यावर्षीचात्रास अखेरचा असेल पुढल्या वर्षीपासून रस्ता पूर्ण झालेला असेल, आरवली ते कांटे दरम्यानचा रस्ता रखडला. त्याला वेगवेगळी कारणे आहेत.
मुंबईत पुढील काही दिवस पावसाळी अधिवेशन चालणार आहे. मी शनिवारी मतदारसंघात येणार आहे. येताना चिपळूणमध्ये उतरणार आणि येथून रत्नागिरीला मोटारीने प्रवास करत जाणार. जाताना पूर्ण रस्त्याची पाहणी करणार आहे.
व्यावसायिकांची काढली समजूत
संगमेश्वरमध्ये बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते. त्या ठिकाणची पाहणी केली. बाजारपेठेत खोकेधारक आणि टपऱ्या आहेत. ते उठवले गेले तर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल. मी आज तिथल्या व्यावसायिकांशी चर्चा केली आहे. त्यांची समजूत काढली आहे. तोही प्रश्न लवकरच सुटेल.
.. तर ते चुकीचे नाही
लोक पालकमंत्री म्हणून मला आणि सरकार म्हणून महायुतीला जबाबदार धरत असतील त्यात लोकांचे काही चुकीचे नाही. मी स्वतः आज या रस्त्याची पाहणी केली. अधिकाऱ्यांना खड्डे भरण्याबाबत कडक शब्दात सूचना केली आहे, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:0 AM 01/Jul/2025














