दापोली : समुद्र किनाऱ्याागर राहणाऱ्या नागरिकांना संध्या निसर्गाच्या नव्यानव्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत. शनिवारी (ता. २८) एक दुर्मीळ समुद्री पाहुणा म्हणून मुखवटा असलेला बुबी पक्षी (Masked Hooby) मुर्डी परिसरात दिसला, त्याला आंजर्ले येथील चाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअरकडून यशस्वीरित्या रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
शनिवारी दुपारी मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतामध्ये एक मोठा बदकासारखा पक्षी थकलेला आणि अडचणीत आढळून आला, त्यांनी तत्काळ दापोली वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभाग आणि वाईल्ड अॅनिमल रेम्युअर या संस्थेचे जवळच अमलेले प्रशिक्षित वन्यजीव रक्षक मनित बाईत आणि प्रतीक बाईत हे दोघेही काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याची तपासणी केली असता ती फारच थकलेला पंख ओले आणि हालचाली अत्यंत मर्यादित होत असल्याचे आढळून आले.
हा पक्षी दापोलीमध्ये नियमित आढळणाऱ्या पक्षांपेक्षा वेगळा होता. हा पक्षी नियमित स्थलांतरित पक्षी नसून क्वचित काही कारणास्तव पश्चिम किनारपट्टीवर दिसतो. त्याला काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्याच्यातर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक तपासणी करून विश्रांती देण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेमध्ये वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर संख्येचे मनित आणि प्रतीक यांनी अत्यंत दक्षता व तांत्रिक कौशल्याने काम केले. यानंतर संध्याकाळी ४ वाजता आंजर्ले येथील समुद्रकिना-यावर सुरक्षितरित्या सोडण्यात आले. त्याने पंख पसरवून समुद्राच्या दिशेने उड्डाण केली.
हा एक परदेशी समुदी पक्षी आहे. जो सामान्यतः हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरातील दुर्गम बेटांवर आढळतो. भारतात तो तो स्थलांतरीत म्हणून कधी कधी दिसतो. विशेषतः वादळानंतर, चकवा किंवा अन्नशोधामुळे चुकून किनाऱ्यावर पोहोचतो. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा अंदमान निकोबार भागात याच्या अतिदुर्मळ नोंदी आहेत. असा कोणताही वन्यजीव आढळल्यास वाईड अॅनिमल रेस्क्यूअर किंवा दापोली वन विभाग यांच्याशी संपर्क करा- मनित बाईत, वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर, आंजर्ले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 30/Jun/2025














