मसाप चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची निवड करण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात मसापची सर्वसाधारण सभा झाली.

त्यामध्ये २०२५-३०च्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते निर्णय करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी अशी – उपाध्यक्ष प्रा. सोनाली खर्चे, मनीषा दामले, कार्यवाह प्राची जोशी, कोषाध्यक्ष प्रकाश घायाळकर, स्पर्धा समिती – रवींद्र गुरव, प्रदीप मोहिते, दीपक मोने. कार्यक्रम समिती – शिवाजी शिंदे, प्रकाश गांधी, समीर कोवळे, केसर देसाई, वाङ्मय समिती मुझफ्फर सय्यद, महम्मद झारे, नेहा ओतारी.

मसाप ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. आगामी काळात चिपळूण शाखेच्या वतीने आगामी काळात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मसापचे कोकण प्रतिनिधी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, भाषा अभ्यासक-समीक्षक अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, लोटिस्माचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 30-06-2025