दापोली : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी शैलेश मोरे याच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, शैलेश मोरे याने समाजमाध्यमावर एका समाजासंदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्याची माहिती मुरूड येथील एका युवकाला शुक्रवारी (ता. २७) मिळाली. त्यांनी ती दापोली येथील संबंधित समाजातील पदाधिकारी यांना दिली. त्यानंतर मोरे याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी युवकांसह अनेकजण पोलिस ठाण्यात हजर झाले; मात्र रात्री उशिरापर्यंत मोरे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली नाही. संबधित युवकाला सकाळी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानुसार संशयित शैलेश मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 30/Jun/2025














