चिपळूण : प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाकडून येथील आगारास एसटीच्या नवीन पाच एसटी बस देण्यात आल्या. शुक्रवारी (ता. २७) आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते या नवीन गाड्यांचे लोकार्पण श्रीफळ वाढवून करण्यात आले. आमदार जाधव यांनी एसटी शहर परिसरात चालवून प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे या नवीन एसटी बसकडे लक्ष वेधून घेतले.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय १० एसटी बस पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे चिपळूण आगाराला ५ नवीन एसटी बस मिळाल्या आहेत. अजून ५ नवीन गाड्या लवकरच दाखल होणार आहेत. एसटीचे कर्मचारी या बसगाड्या मिळाल्याने सुखावले आहेत. या पाचही बस चिपळूण आगारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रांगोळी काढत व पेढे वाटून आनंद साजरा केला.
यानंतर आमदार जाधव व निकम यांच्या हस्ते या नवीन गाड्यांच्या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. आमदार जाधव यांनी एसटी बस चालवून शहरातून फेरफटका मारला. आमदार निकम प्रवासी म्हणून बसमध्ये उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाले, जिल्ह्यात एसटीच्या ५५ नवीन बस दाखल झाल्या आहेत. चिपळूण आगारास ५ नवीन बस मिळाल्या आहेत. उर्वरित बसेस लवकरच दाखल होतील, असा विश्वास व्यक्त केला. आमदार निकम म्हणाले, नवीन बसमधून चांगला प्रवास झाला. बसचे स्टेअरिंग आमदार जाधव यांच्या हाती असल्याने आम्ही बिनधास्त होतो. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, जयंद्रथ खताते, दादा साळवी, शौकत मुकादम, मिलिंद कापडी, उदय ओतारी, दशरथ दाभोळकर, मयूर खेतले, रमेश राणे, नीलेश कदम, बिलाल पालकर, आदिती देशपांडे, पूजा निकम, आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 30/Jun/2025














