Gold Price Hike : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. ३० जून २०२५ रोजी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या जवळ पोहोचला असून, चांदीनेही प्रति किलो १ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत आहेत.
आज तुमच्या शहरातील सोन्याचा भाव (३० जून २०२५)
दिल्ली: २२ कॅरेटसाठी प्रति १० ग्रॅम ८९,४४० रुपये तर २४ कॅरेटसाठी ९७,५६० रुपये
ृमुंबई, चेन्नई, कोलकाता: २२ कॅरेटसाठी प्रति १० ग्रॅम ८९,२९० रुपये तर २४ कॅरेटसाठी ९७,४१० रुपये
२२ कॅरेट आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
तुमच्या माहितीसाठी, २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध (९९.९%) मानले जाते, तर २२ कॅरेट सोन्यात टिकाऊपणासाठी तांबे आणि चांदीसारखे धातू मिसळलेले असतात. दागिने बनवण्यासाठी सहसा २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो.
एमसीएक्स आणि जागतिक बाजारातील स्थिती
फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव ०.२३ टक्क्यांनी वाढून ९५,६९२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, चांदीचा भाव ०.२० टक्क्यांनी वाढून १,०५,४४१ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.
जागतिक बाजारात, COMEX वर सोने ०.३१ टक्क्यांनी महाग होऊन ३२९७.९० डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत ०.३५ टक्क्यांनी कमी झाली आहे, तरीही देशांतर्गत बाजारात चांदी महागली आहे.
सोन्याच्या दरात चढउतार का?
सोन्याच्या दरातील या चढउतारामागे अनेक जागतिक कारणे आहेत. जागतिक आर्थिक स्थिती, महागाईची भीती आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सोन्याला अधिक सुरक्षित पर्याय मानतात, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि दरही वाढतात. सध्या बाजारात अस्थिरता असली तरी, सोने अजूनही गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचा आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:04 30-06-2025














