चिपळूण : शिक्षण हे प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असून, त्यात तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ग्रामीण विद्यार्थीही जागतिक स्पर्धेत टिकू शकतात. कोकण रेल्वेने केलेल्या या उपक्रमामुळे शाळांमध्ये सकारात्मक बदल घडतील व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना सायकल, हायजिन किट, संगणक सेट आणि प्रिंटर यांचे वाटप करण्यात आले.
आगवे व मांडकी येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थिनींना सायकल व हायजिन किट प्रदान करण्यात आले. खरवते व मांडकी शाळांना संगणक सेट आणि प्रिंटर देण्यात आला. कार्यक्रमाला क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक बापट, वरिष्ठ कार्मिक अधिकारी महेश सारवळकर, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, मुख्य कार्मिक निरीक्षक रणजित केसरे, क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार, आयटी विभागाचे महेश रेवंडकर, माजी सभापती पूजा निकम उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 30/Jun/2025














