अमली पदार्थांपासून दूर राहा : पोलिस निरीक्षक नितीन गवारे

मंडणगड : अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे माणसाची दुरवस्था होते. याची माहिती सांगताना व्यसन करणे सोपे आहे; परंतु ते सोडणे अतिशय कठीण आहे. समाजामध्ये अमली पदार्थांचे व्यसन रोखणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अनेकजण अमली पदार्थांच्या आहारी जाऊन नाहक जीवन उद्ध्वस्त करतात म्हणून विद्यार्थ्यांनी यापासून चार हात दूर राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी केले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कनिष्ठ महाविद्यालय व मंडणगड पोलिस ठाण्यातर्फे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.

या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, पोलिस गणेश चव्हाण, आम्रपाली आवळे, अमित भोसले, विनय पाटील, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. अशोक साळुंखे आदी उपस्थित होते. अमली पदार्थविरोधी दिनावर एनएसएस स्वयंसेवकांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 30/Jun/2025