साडवली : संगमेश्वर तालुक्यातील जनता विद्यालय आंगवली येथे शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया शालेय स्तरावर नुकतीच झाली. इतिहासात पहिल्यांदाच शालेय स्तरावर ही निवडणूक प्रक्रिया इव्हीएमद्वारे घेण्यात आली. या प्रक्रियेत EVM SIMULATOR द्वारे ही निवडणूक घेण्यात आली.
ही निवडणूक एकूण ३ पदांसाठी घेण्यात आली. यामध्ये जी.एस., उप जी. एस. आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी या पदांचा समावेश होता. जी.एस. पदासाठी ३, उप जी. एस. पदासाठी ५ आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठी ३ उमेदवार असे एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. ही सर्व प्रक्रिया सहाय्यक शिक्षक शैलेश कदम यांच्या संकल्पनेतून पार पडली. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेदेखील प्रक्रियेत सहभागी होते.
मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष ही भूमिका सर्व प्रशालेतील शिक्षक बंधू, भगिनींनी पार पडली. यामध्ये सौ. कल्पना जाधव, सौ. सिध्दी चिंचवलकर, सौ. स्वप्नाली पेडणेकर, सूरज जाधव, साहिल काजरेकर व प्रशालेचे मुख्याध्यापक अजितकुमार चव्हाण हे होते. या निवडणुकीत जी. एस. म्हणून रिद्धी गुरव, सब जी. एस. अर्णव अणेराव व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून तन्वी खांडेकर हे विद्यार्थी निवडून आले. मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 30/Jun/2025














