खेड : तालुक्यातील धामणंद-गावठण येथील ३५ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची घटना २८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. राहुल राजाराम खैर असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते.
त्यामुळे पत्नी मुलांसह माहेरी राहण्यास गेली होती. तो घरी एकटाच असताना दारूच्या नशेत दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:44 PM 30/Jun/2025














