तुळसणी येथे उलटी जुलाबाने प्रौढाचा मृत्यू

देवरुख : तालुक्यातील तुळसणी येथील एका प्रौढाचा उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. प्रकाश सीताराम मोहिते (वय ४१, रा. तुळसणी), असे मृताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश मोहिते यांना उलट्या व जुलाबाचा जास्त त्रास होऊ लागल्याने गावातील रिक्षाने तुळसणी येथील खासगी डॉक्टरकडे बेशुद्धावस्थेत दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी त्याला तपासून पुढील उपचाराकरिता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

यावेळी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावधगिरी म्हणून असा उलट्या, जुलाबांचा त्रास परिसरातील आणखी कोणाला होत आहे का, याची माहितीही संबंधित यंत्रणेकडून घेतली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 01/Jul/2025