लोवले येथे रस्त्यावर झाड कोसळले

संगमेश्वर : देवरूख- संगमेश्वर-कोल्हापूर या मुख्य रस्त्यावर संगमेश्वर परिसरात रविवारी दुपारी सुमारे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास लोवले येथे एक झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे काही काळ वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड कोसळल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनचालक आणि प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 01/Jul/2025