स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासातला उच्चांकी प्रतिसाद; दिवसभरात २ कोटी ७ लाखांच्या ठेवी संकलित : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी, दि. ३० जून २०२५ : स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासात ३० जून रोजी रु.२ कोटी ७ लाख रुपयांची नवी ठेव जमा झाली. ठेवीदारांचा उत्साह संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये ओसंडून वाहत होता. संस्थेच्या १७ ही शाखांमध्ये आज ठेवीदारांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. या ठेव वृद्धी मासात ऐका दिवसात रु.२ कोटी ४लाख संकलित होण्याची ही पहिली वेळ असून सोमवार दिवसभरात ६५ ठेवीदार सभासदांनी आपल्या ठेवी संस्थेत गुंतवल्या असून आजचे ठेवींचे संकलन हे संपूर्ण यंत्रणेसाठी वेगळी ऊर्जा देणारे आहे.

या ठेव वृद्धी मासात पहिल्या १० दिवसात संस्थेच्या नवीन ठेवी रु.७ कोटी ९६ लाख झाल्या असून संस्थेच्या एकूण ठेवी रुपये ३५९ कोटी झाल्या आहेत.

पतसंस्थांना त्यांच्या स्वनिधीच्या १० पट ठेव उभारणी करता येते. स्वरूपानंद पतसंस्थेचा स्वनिधी ४८ कोटींचा आहे. त्याच्या १० पट म्हणजे ४८० कोटींच्या ठेवी संस्था उभारू शकते. मात्र ठेवी उभारताना कर्ज मागणी लक्षात घ्यावी लागते. कर्ज मागणीचा अंदाज घेऊन त्यानुसार त्याप्रमाणात ठेवी उभारणे महत्त्वाचे असते. आज अखेर संस्थेचा C.D रेशो ६३% आहे. त्या प्रमाणात ३७० कोटींपर्यंत ठेवी उभारणे किफायती ठरणारे आहे. संस्थेच्या गुंतवणुका १४८ कोटी ६८ लाख एवढ्या असून SLR आणि अन्य निधींची १००% गुंतवणूक स्वरूपानंद पतसंस्थेने केलेली आहे.

संस्थेची जनमानसातील विश्वासार्ह प्रतिमा संस्थेकडे येणारा ठेवींचा ओघ अधोरेखित करते असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले. ठेव वृद्धीमासाच्या उर्वरित कालावधीत ठेवीदारांनी संस्थेच्या विश्वासार्ह व आकर्षक सुरक्षित योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करावी, असे आवाहनही ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 01-07-2025