राजापूर : सागरी महामार्गावर तालुक्यातील जैतापूरकडील उतारावर एक टँकर अडकला. काल सकाळी हा प्रकार घडला. त्यामध्ये लहान चारचाकी वाहने मार्गक्रमण करू शकत असली, तरी मोठ्या वाहनांच्या वाहतुकीला अडथळा झाला होता. दोन क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने टँकरला हटवण्यात यश आल्याने सुमारे चार तासांनंतर या मार्गावरून सर्व वाहतूक सुरू झाली आहे.
सागरी महामार्गावर तालुक्यातील जैतापूरकडील उतारावर एक टँकर अडकल्याची घटना काल सकाळी घडली. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करताना रत्नागिरीहून देवगडकडे जाणारी वाहने धाऊलवल्ली फाटा जाकादेवी मार्ग ते जैतापूर या मार्गाने तर जैतापूर पुलावरून येणारी वाहने धाऊलवल्ली-जाकादेवी मार्ग धारतळेमार्गे रत्नागिरीकडे या मार्गाने रवाना झाली. दरम्यान, रस्त्यामध्ये आडवा पडलेला टँकर हटवण्यासाठी तत्काळ दोन क्रेन आणि जेसीबी घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या साह्याने टँकर रस्त्यातून बाजूला करण्यात यश आले. हा मार्ग सध्या सर्व वाहनांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 01/Jul/2025














