खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि. ९ जून २०२५ रोजी एका मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनासाठी सफाई कामगाराने नातेवाईकांकडून एक हजार रुपये मागितल्याची लेखी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठांकडे अहवाल दिला असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत ९ जून रोजीच वैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर १२ जून रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे यांनी संबंधित कर्मचारी राजू वाघेला याच्याकडून लेखी खुलासा मागवला. मात्र, १३ जून रोजी सादर केलेला खुलासा असमाधानकारक ठरला असून, या प्रकरणाबाबत पुढील कारवाईसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत खडोळ यांनी दिली. या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनात तसेच स्थानिक पातळीवर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 01/Jul/2025














