रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या नाटेकर, गांधी, कीर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका मानसी चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोकणदीपतर्फे सन्मान पदक व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. दिलीप शेडगे, डॉ. सुकृत खांडेकर, दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर कदम उपस्थित होते. गेल्या पंधरा वर्षांपासून चव्हाण शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्यक्षेत्रात अनेक प्रबंध प्रकाशित झाले आहेत. मराठी, इतिहास, हिंदी, अर्थशास्त्रात त्यांनी एमए केले असून, एमएड् विशेष प्रावीण्य, सेट (मराठी) २०१८, एमफील, विधी पदवीसुद्धा मिळवली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 01/Jul/2025














