नाटे बाजारपेठेत मटका-जुगार अड्ड्यांवर छापा

रत्नागिरी : नाटे-बाजारपेठ (ता. राजापूर) येथे पोलिसांनी मटका-जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी साहित्यासह १ हजार ४७५ रुपये तर दुसऱ्या ठिकाणी ३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात विश्वनाथ नारायणमिराशी (वय ६१, रा. नाटे-भराडीनवाडी ता. राजापूर) व सत्यवान एकनाथ पवार (वय ५७, रा. मंदरूळ पवारवाडी, ता. राजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (ता. २८) दुपारी साडेबारा ते अडीचच्या सुमारास नाटे-बाजारपेठ येथे संशयित विनापरवाना मटका जुगार खेळ चालवत असताना सापडले. त्यांच्या बाजारपेठ येथून साहित्यासह १ हजार ४७५ रुपये, तर बाजारपेठ एसटी पिकअप शेडच्या पाठीमागील बाजूस एका शेडमध्ये ३५५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस हवालदार विक्रम पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अनिक केसकर यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 01/Jul/2025