रत्नागिरी : पेठकिल्ला येथील दुचाकी जळीत प्रकरण अतिशय गंभीर होते. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेले हे कृत्य असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत फिर्यादीच यातील आरोपी असल्याचे मोठ्या कौशल्याने शोधून काढले. संशयिताने काळ्या रंगात लिहिलेल्या अक्षरावरुन पोलिसांच्या मनातील शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर संशयित कुठे कुठे गेला याची पुराव्यानिशी पूर्ण माहिती काढली आणि खात्री झाल्यानंतर काल रात्री संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, निहाल मकसूद मुल्ला (वय ३६, रा. भाटकरवाडा, पेठकिल्ला-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
ही घटना गुरुवारी (ता. २६) मध्यरात्री साडेबारा ते साडेचारच्या सुमारास पेठकिल्ला भाटकरवाडा येथे घडली. यामध्ये गाडीमालक मिरकर फाजल, निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या एक बुलेट, एक अक्सेस आणि एक अॅक्टिव्हा, आशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. संशयित निहाल याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 01/Jul/2025














