रत्नागिरी : अनोळखी मयत पुरुषाचे नाव व गाव समजून येत नाही. त्याचे वय वर्षे अंदाजे ५५ वर्षे असून तो १९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मौजे मिरजोळे, पडवेवाडी येथील रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील संगम हॉटेलच्या पडीक इमारतीच्या गाळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. कुवारबाव पोलिस चौकी येथील पोलिसांच्या मदतीने त्यास खासगी अॅब्युलन्समधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून १९ जून रोजी दुपारी २ वाजता मयत झाल्याचे घोषित केले.
या व्यक्तीच्या अंगावर पांढरट रंगाचे मळकटलेले हाफ बाह्याचे टी-शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट आहे. या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असल्यास पोलिस निरीक्षक रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 01/Jul/2025














