रत्नागिरी : उपप्रादेशिक कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा जुलैचा तालुका शिबिर दौरा

रत्नागिरी : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा जुलैमधील जिल्ह्यातील तालुका शिबीर दौरा आयोजित करण्यात आला आहे.

मोटार वाहन निरीक्षकांचा चिपळुण तालुका दौरा १, ८, १५, २२ आणि २९ जुलै, खेड तालुका ३ आणि १७जुलै, दापोली तालुका – २ आणि १६ जुलै, मंडणगड तालुका – ९ जुलै, गुहागर तालुका- २३ जुलै, देवरुख -३० जुलै, लांजा तालुका २४ जुलै, आणि राजापूर तालुका २५ जुलै २०२५ तालुका शिबिर दौरा असणार आहे. मोटार वाहन निरीक्षक हे जनतेच्या सोयीसाठी जिल्हा दौरा करतात. त्यावेळी शिबिर दौऱ्यांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार कामे करण्यात येतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 01/Jul/2025