व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होतेय : पोलिस उपनिरीक्षक अभय गुजर

गावतळे : समाजातील युवक-युवतींना, तरुणांना गांजा, ड्रग्ज, दारू (मद्यपान), धूम्रपान इत्यादी प्रकारे व्यसनाधीन करून पिढी उध्वस्त करण्याचे कार्य काही समाजकंटक करत आहेत, असे पोलिस उपनिरीक्षक अभय गुजर यांनी सांगितले.

दापोली तालुक्यातील यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय, पंचनदी तालुका दापोली प्रशालेत २६ जून रोजी राजपों शाहू महाराज जयंती व जागतिक अमली पदार्थविरोधी दिन साजरा करण्यात आला. शिक्षक आशुतोष साळुंखे यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याचा तपशील विद्यार्थ्यांसहित सर्वांना कथन केला. राजर्षी शाहू महाराज हे गरिबांचे कैवारी होते. सर्वांना शिक्षण मिळावे याकरिता जे पालक मुलांना शिक्षण प्रवाहात आणणार नाहीत त्यांना दंड कर रूपात ठोठावण्यात आले. अनेकांसाठी वसतिगृहे स्थापन केली. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. त्याबरोबर दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभय गुजर व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाला पंचनदी हायस्कूलचे ८ वी ते १० वीचे व रामराजे कॉलेज, पंचनदीचे १२ वीचे विद्यार्थी, मुख्याध्यापिका अर्चना मकू उपस्थित होते. कॉलेजवयीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींनी याबाबत जागरूक राहून शिक्षक, पोलिसमित्र इत्यादींजवळ संपर्क करून इतर सर्वांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अंमली पदार्थांमुळे खून, अत्याचार, बलात्कार, महिलांचे शोषण आदी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 01/Jul/2025