लांजा बाजारपेठेत कल्याण मटका अड्ड्यावर छापा; जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त

लांजा, [३० जून, २०२५]: लांजा बाजारपेठेतील शेटये पेट्रोलपंपाजवळच्या गल्लीत एका बंद टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दिनांक ३० जून २०२५ रोजी दुपारी २.४५ वाजता लांजा बाजारपेठेत अवैध जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन प्रभाकर डोमणे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी छापा टाकला.

या छाप्यात दिलीप जनार्दन बाईत (वय ३६, रा. जाकादेवी मंदिर, लांजा) हा व्यक्ती कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळवताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १५२० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य असा एकूण १५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी, दिनांक ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.५९ वाजता लांजा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२६/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध जुगाराच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 01-07-2025