राजापूर : आतापर्यंत दर मंगळवारी आठवडा सुटीमुळे बंद राहणारे राजापूर नगर वाचनालय यापुढे दर रविवारी बंद राहणार आहे. रविवारी सर्वसाधारण सुटीच्या दिवशी वाचकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून मंगळवार ऐवजी रविवारी आठवडा सुटी ठेवण्याचा निर्णय राजापूर नगर वाचनालय या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला.
राजापूर नगर वाचनालय या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगर वाचनालय सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रभात पाध्ये यांच्या अध्यक्षताखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष शेखरकुमार अहिरे, किशोर जाधव, अतुल नवरे, राजेंद्र रानडे, श्रृती ताम्हणकर, सुहास ओळकर, जयेश हर्डीकर आदी कार्यकारी मंडळातील सदस्य तसेच अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, दिनानाथ कोळवणकर, विजय पाध्ये, प्रसन्न मालपेकर, जयंत कदम, गोविंद मराठे, दीपाली पंडित, अनामिका जाधव आदी उपस्थित होते. स्वागत कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी केले. १५८ वा वार्षिक अहवाल सभेपुढे सादर करण्यात आला. लेखापाल म्हणून नीलेश पाटणकर यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. ग्रंथपाल सौ. कारेकर यांना उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून गौरव झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत पारित करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 02/Jul/2025














