मेष- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे.
वृषभ- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल.
आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल.
मिथुन- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल.
कर्क- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे.
सिंह- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल.
कन्या- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल.
तूळ- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज नोकरी – व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे.
धनू- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल.
कुंभ- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अवैध कृत्यांपासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल.
मीन- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 02-07-2025














