मंडणगड : पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाने रद्द केल्याने मंडणगड शहरात शिवसेना ठाकरे गट व मनसे यांनी शहरातील मुख्य चौकात आनंद उत्सव साजरा केला. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक जितेंद्र दवंडे, सल्लागार रघुनाथ पोस्टुरे, मोहन दळवी, समीर कदम, दशरथ सापटे, अभय पिचुलें, विश्वनाथ टक्के, कलंदर जोगिलकर, मनसेचे नवज्योत गौड व दोन्ही पक्षाचे तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते.
पक्षाचा जयजयकार करीत फटाके फोडण्यात आले. नागरिकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याचबरोबर नूतन विद्यामंदिरमधील पहिलीच्या वर्गात मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुका संघटक जितेंद्र दवंडे म्हणाले, राज्य सरकारने बालकांवर केलेली हिंदी या विषयाची सक्ती शिवसेना व मनसे यांनी हाणून पाडली आहे. पाच तारखेच्या मोर्चाच्या आव्हानास शासन घाबरले व शासन निर्णय मागे घेतला. त्याचा आनंद असून तो मिठाई वाटून साजरा केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 02/Jul/2025














