रत्नागिरी : लाखो वारकरी, भाविक आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अनेक भाविक, वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उर्वरित भाविक, वारकरी हे एसटी, रेल्वेने जातात. यासाठी जिल्ह्यातून एसटी विभागानेही गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत २३ एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. ३ जूनला रत्नागिरीसह विविध आगारांतून एसटी बस पंढरपूरला रवाना होणार आहेत. अजून काही दिवस असल्याने भाविकांनी जास्तीत जास्त आरक्षण करावे, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने केले आहे.
आषाढी वारी काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे काही वारकरी, भाविक उन, वारा, अंगावर पावसाच्या सरी झेलत पायी जाण्यासाठी निघाले आहेत. विठुनामाचा गजर करीत लाखो वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. वारकरी, भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जिल्ह्यातून आतापर्यंत २२ एसटी बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. अजून काही दिवस शिल्लक असून ३० ते ३५ गाड्या बुकिंग होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ३० एसटी बसेस पंढरपूरला धावल्या होत्या. रत्नागिरीकरांनी पंढरपूरला खासगी बसेस, सायकलवारी करून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले आहे. उर्वरित भाविकांना पंढरपूरला जायचे असेल तर आताच एसटी आरक्षण करावे, असेही आवाहन करण्यात आले.
महिला, ज्येष्ठांसाठी सवलत
आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाने यंदाही ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिला, ६५ वर्षांवरील नगारिकांसाठी अर्धे तिकीटे असणार आहे. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असेही आवाहन एसटी आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 02/Jul/2025














