रत्नागिरी : विद्यार्थ्यांवरील अत्याचार, विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्याला मारहाण इतकेच नव्हे, तर खुनासारख्या घटना राज्यात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून आता राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची सुरक्षा जपण्यासाठी शाळांमध्ये उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशनही केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेल्या अत्याचार, मारहाण, खून, यासारख्या घटनानंतर सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजनेबाबत सूचना केल्या होत्या. यामध्ये समुदपदेशानवारही भर देण्यत आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.
शाळेच्या शिक्षकांना समुपदेशन प्रक्रिया नियमित राबविली जात आहे. जिल्ह्यात नऊ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार ३८४ शाळा आहेत. माध्यमिक शाळा ३५०, तर १३४ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. अनुदानित शाळांमधून समुपदेशन केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जात आहे. यासाठी शिक्षकांना परीक्षा मंडळाकडून खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. समुपदेशानाद्वारे विद्यार्थ्यांचे मन परिवर्तन करण्यातचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक रजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकासासाठी समुपदेशन गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 02/Jul/2025














