नेवरे-काजरभाटी येथे मटका जुगारावर छापा

रत्नागिरी : तालुक्यातील काजरभाटी-नेवरे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना मटका जुगारावर कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल वासुदेव चाफेरकर (वय ४७, नेवरे-काजरभाटी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० जून सायंकाळी सहाच्या सुमारास काजरभाटी नेवरे येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नेवरे-काजरभाटी येथे विनापरवाना मटका सुरु असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह संशयिताकडून १ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार भैरवनाथ सवाईराम यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 02-07-2025