खेड : तालुक्यातील देवघर गावी रविवारी सायंकाळी बिबट्याने गाईवर हल्ला केल्याने गाय जबर जखमी झाली आहे. देवघर निवाची वाडी येथील शेतकरी पंढरीनाथ मोरे आपल्या गायरानामध्ये गायी चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी ३ वाजण्याच्या दरम्यान झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने गाईवर प्राणघातक हल्ला केला.
शेतकऱ्याने आरडा ओरड केल्याने गाईला वाचवण्यात यश आले. हल्ल्यात गाय जखमी झाली आहे. यामुळे देवघर गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 02/Jul/2025














