पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी देवरुख पोलीस ठाण्याचा स्वीकारला पदभार

देवरुख : शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी उदय झावरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कडक शिस्तीचे असणारे उदय झावरे यांची देवरुख येथे बदली झाल्याने अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला असल्याची चर्चा आहे.

उदय झावरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आहेत. सध्या ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे कार्यरत होते. कर्तव्यदक्ष व कडक शिस्तप्रिय ओळख असलेले उदय झावरे यांची देवरुख पोलिस ठाणे येथे बदली झाली असून त्यांनी आपल्या पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. या पूर्वी संगमेश्वरमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. यावेळी बोलताना सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असून देवरुखसह परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित राखण्यावर आपला भर राहणार असल्याचे झावरे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 02/Jul/2025