रत्नागिरी : शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘एक पेड माँ के नाम २.०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड शाळेच्या परिसरात किंवा गावात लावायचे आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार ४०० शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे यावर्षी जि. प. चे ६५ हजार विद्यार्थी हे झाड लावणार आहेत.
२०२४ मध्ये जागतिक पर्यावरण दिनापासून एक पेड माँ के नाम’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. आईच्या नावाने एक झाड प्रत्येकाने लावणे असा या योजनेचा उद्देश असून पीएम मोदी यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत बदलत्या हवामान बदलाचा परिणाम सजीवसृष्टीसह अन्य क्षेत्रांवरही होत आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड महत्त्वाची मानली आहे. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. म्हणूनच ‘एक पेड माँ नाम’ हे जागतिक अभियानाचा सुरू करण्यात आले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे लावण्यात आली. त्यानंतर २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावण्याचा निर्धार आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने असोला भाटी वन्यजीव अभयारण्यात २० जून २०२४ रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले.
या मोहिमेचा एक भाग म्हणून कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे १ जुलै रोजी विविध ठिकाणी कार्यक्रम राबविले गेले. जि. प. च्या २ हजार ४०० प्राथमिक शाळांमध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचे काम विद्यार्थी करत आहेत.
यावर्षी प्रत्येक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असल्याने ६५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानासाठी शासनाने स्वतंत्र अशी वेबसाईट तयार केली असून या वेबसाईटवर झाड लावताना मुलाचा फोटो टाकला तर सहभागाचे प्रमाणपत्र मिळते.
हे अभियान एक जनचळवळ
हे अभियान एक जनचळवळ असून लोक वृक्षारोपण करून आपल्या मातेला आणि पृथ्वीमातेला मान वंदना दिली जात आहे. शेतीमध्ये शाश्वत शेती साध्य करण्यासाठी वृक्षलागवड हे महत्त्वाचे पाऊल आहे. माती, पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढविण्यास झाडे मदत करतात. या अभियानात जमिनीचा -हास आणि वाळवंटीकरण रोखण्याची आणि ती बदलण्याची अफाट क्षमता आहे.
जि. प.चे कृषी विभागाला पत्र
शासनाने जि. प.ला उपक्रमात सहभागी होण्याबाबत सूचना केल्या होत्या. इतक्या प्रमाणात झाडं उपलब्ध होण्याबाबत जि.प.ने आता कृषी व वनविभागाला पत्र दिले आहे. त्यानुसार ही झाडे कृषी विभाग शाळांना देणार आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 02/Jul/2025














