गुणरत्न सदावर्ते बिग बॉस मधून तडकाफडकी बाहेर..?

मुंबई – सलमान खान होस्ट करत असलेला रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या शोमधील सध्या चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. सदावर्ते कायम त्यांच्या हटके अंदाजामुळे आणि रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असतात. अशातच सदावर्ते बिग बॉस १८च्या घरातून बाहेर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गुणरत्न सदावर्ते शोमधून बाहेर?

गुणरत्न सदावर्ते यांना काही वेळासाठी घराबाहेर पाठवल्याच्या चर्चा सुरू आहेत. उच्च न्यायालयात त्यांची एक केस सुरू असल्यामुळे केसच्या संदर्भात त्यांना घराबाहेर पाठवलं असून ती केस पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये गुणरत्न सदावर्ते एव्हिक्ट झाल्याची माहिती आहे. हायकोर्टात मराठा आरक्षणाची केस सुरु असून गुणरत्न सदावर्तेंनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र ते सुनावणीला गैरहजर राहिल्याने हायकोर्टाने प्रश्न विचारला. त्यावर इतर वकिलांनी ते बिग बॉसमध्ये गेल्याची माहिती दिली. त्यावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. केस सुरू असताना सदावर्ते बिग बॉस या रिऍलिटी शोमध्ये कसे जाऊ शकतात असा प्रश्न हायकोर्टाने विचारला होता.

सदावर्ते बिग बॉसच्या घराबाहेर जाणार म्हटल्यास प्रेक्षकांचा हिरमोड झालेला आहे. त्यामुळे आता मनोरंजन कसा होणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:16 15-10-2024