रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून दुचाकीची चोरी

रत्नागिरी : कोकण रेल्वे स्टेशन येथील एका हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ जून ते १ जूलै या कालावधीत रेल्वे स्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल समोरील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र पंढरीनाथ नागवेकर (वय ५६, रा. नागवेकरवाडी, संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी रेल्वे स्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल समोरील रस्त्यावर दुचाकी (क्र. एमएच-०८ एस ०१५१) ही पाच दिवस पार्क करुन ठेवली होती. अज्ञाताने ती पळविली. या प्रकरणी महेंद्र नागवेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 03-07-2025