लांजा : लांजा तालुक्यातील आसगे पुलाजवळ, गुरववाडी फाटा येथे ३० जून २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. लांजा पोलीस ठाण्यात आरोपी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद लांजा पोलीस ठाण्याचे सपोनि. ११७४ सचिन सुरेश भुजबळराव (वय ४९) यांनी २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.१९ वाजता दिली आहे. एजाज रियाज खान (वय २६, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एजाज रियाज खान हा आपली हिरो ग्लॅमर मोटारसायकल (क्र. एमएच ०८ एडीड ८१८५) कुरचुंब ते कोर्ले फाट्याकडे दाभोळे ते लांजा रोडने घेऊन जात होता. ३० जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तो आसगे पुलावर, गुरववाडी फाटा येथे आला. यावेळी त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, आपली दुचाकी हयगयीने, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात चालवली.
याचवेळी समोरून लांजा बाजुकडून येणाऱ्या आर.जे. १९ एसटी १०२९ या मोटारसायकलला एजाज खानच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुसऱ्या दुचाकीवरील उमा रुमनारायण पाल (वय २१, रा. पन्ना, मध्यप्रदेश, सध्या लांजा, आय.टी.आय. जवळ) हे किरकोळ आणि गंभीर जखमी झाले. तसेच दोन्ही दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) (ब) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 03-07-2025














