वळके ग्रामपंचायतीत कृषिदिनी भात लागवड

पावस : रत्नागिरी तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीत कृषिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा वळके येथे गावचे सरपंच उत्तम सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

येथील शेतकरी सुवेद शिवगण यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. याप्रसंगी सरपंच उत्तम सावंत, ग्रामपंचायत सदस्य माधुरी सावंत, सुभाष सावंत, उषा सावंत, ग्रामपंचायत अधिकारी दळवी, सहायक कृषी अधिकारी सागर सांगवे, कृषी सेवक अजय कल्याणकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 03/Jul/2025