पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेसाठी रत्नागिरी, चिपळूण, खेडची निवड

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे. या तालुक्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत १ कोटी घरांना सौरऊर्जा सबसिडीद्वारे पुरवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी १०० शहरांची निवड केली आहे. शंभर शहरांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तीन तालुक्यांमधील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावरील सौरऊर्जासाठी जागा उपलब्ध आहे, अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांची प्राधान्याने निवड करावयाची आहे. योजनेच्या लाभासाठी सहायक निबंधक, महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 03/Jul/2025