रत्नागिरी : राज्य शासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन दर महिन्याच्या दहा तारखेनंतर जमा होत होते; परंतु आता ते आदल्या महिन्याच्या अखेरीस संबंधितांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार आदींसाठी वेळेवर पैसे मिळत आहेत. याबद्दल रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिरादार यांचे आभार मानण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे सभासद विठ्ठल-रखुमाई मंदिरात जमले होते. त्या वेळी त्यांनी बिरादार यांनी ज्येष्ठांसाठी केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा दरमहा १० तारखेला होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे घेण्यात आली होती. त्या वेळी दरमहा १ तारखेला निवृत्ती वेतन देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. त्याबाबत कार्यवाही होण्याची ज्येष्ठ नागरिक वाट पाहत आहेत. या वेळी सुरेश लिमये, सुरेंद्र घुडे, शिरीष वारंग, अरविंद वांदरकर, प्रमोद रेडीज, विजय पेडणेकर, सुरेंद्र शेट्ये, अनिल सुर्वे, रणवीर शिंदे, विठोबा चंदरकर, तुळशीदास शेट्ये, सदाशिव तोडणकर, यशवंत पावसकर, अविनाश गवंडे, विनय शितूत आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 03/Jul/2025














