रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आर्थिक साह्य देण्यात येत आहे, अशा महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून परिपत्रक पाठविण्यात आले आहे. ( Ladki Bahin Yojana )
जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना याबाबत निकषांची माहिती देण्यासाठी तसेच संस्था स्थापन करण्यासाठी, मार्गदर्शन व साह्य करण्यासाठी पालक अधिकारी तसेच सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागातर्फे महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गाव तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. ( Ladki Bahin Yojana )
अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी नोंदणीचे निकष असे – गाव कार्यक्षेत्रासाठी 250 सभासद संख्या व दीड लाख भाग भांडवल, नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी 500 सभासद संख्या व 5 लाख भाग भांडवल, तालुका कार्यक्षेत्रासाठी 500 सभासद संख्या व 5 लाख भाग भांडवल आणि जिल्हा कार्यक्षेत्रासाठी दीड हजार सभासद संख्या व 10 लाख भाग भांडवल असेल. ( Ladki Bahin Yojana )
महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व साह्य करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून सहकारी संस्था सहायक निबंधक साहेबराव दत्तात्रय पाटील, (८२७५४५८५४४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Ladki Bahin Yojana )
तालुकानिहाय अधिकारी असे – मंडणगड – सहकारी अधिकारी (श्रे.१) भगवान कोंडिबा आखाडे, (९८६०६९२१५०), दापोली – सहायक निबंधक अनिता बटवाल (९८२१२८९९९१), खेड – सहकारी अधिकारी (श्रे.२) शामल क्षीरसागर, (८४११८२०१२२), चिपळूण- सहायक निबंधक सुशांत घोलप (९८२०६१२०२३), गुहागर – सहकारी अधिकारी (श्रे.१) कुमार मनोहर देवरूखकर (९५२७९५५९४९), संगमेश्वर- सहायक निबंधक अक्षय भापकर (७०२०४८७६९०) रत्नागिरी – सहकारी अधिकारी (श्रे.१) एम. एस. धुमाळ (९९७०२०४०९९), लांजा – सहकारी अधिकारी (श्रे.१) संतोषकुमार शि. पाटील (९७६६९३१५८५), राजापूर – सहायक निबंधक संतोषकुमार शि. पाटील (९७६६९३१५८५).
ज्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांची नागरी पतसंस्था नोंदवावयाची असेल, त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्राच्या संस्थेसाठी जिल्हा उपनिबंधक तालुका किंवा त्यापेक्षा कमी कार्यक्षेत्रासाठी संबंधित तालुका सहायक निबंधकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Ladki Bahin Yojana )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 03-07-2025














