मुलींची सुरक्षितता काळाची गरज : पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील

रत्नागिरी : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज असून, पोलिस विभाग मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी सांगितले. मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतानाच मोबाईलचा अतिवापर टाळणे, अमली पदार्थ तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थिदशा आणि दिशा या विषयावर फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित व्याख्यानाप्रसंगी त्यांनी आवाहन केले. उदय सामंत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचावर मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कांचन नागवेकर, माजी नगरसेविका स्मिता पावसकर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 03/Jul/2025