रत्नागिरी : मुस्लिम बांधवांचा मोहरम तसेच हिंदूंचा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शहर, ग्रामीण पोलिसांनी चंपक मैदान येथे दंगल नियंत्रण योजनेचा सराव केला. यावेळी अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आल्याने दंगलसदृश्य परिस्थिती घटनास्थळी निर्माण करण्यात आली होती.
मोहरम, आषाढी एकादशीच्या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्तरित्या चंपक मैदान येथे दंगल नियंत्रण योजनेचा सराव करण्यात आला.
या दंगल नियंत्रण सरावामध्ये ३० आरसीपी, दोन्ही पोलिस ठाण्यातील ३० कर्मचारी, ४ वाहने, ६४ लाठ्या, ६४ हेल्मेट, ३० शिल्ड, १० रायफल्स, एक मेगाफोन, एक गॅसगन, स्ट्रेचर, १२ बाओर रायफल आदी शस्त्रांचा समावेश होता. दुपारी ३.४५ वाजता सुरू झालेला सराव ४.४५ वाजता संपवण्यात आला.
या सरावात पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह शहर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनीही गर्दी केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 03/Jul/2025









