गुहागर : तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील एका क्लिनिकसमोरील ११ केव्हीची विद्युत वाहिनी जीर्ण झाल्याने मंगळवारी दुपारी अचानक रस्त्यावर तुटून पडली. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणी पादचारी किंवा वाहनचालक नसल्याने अनर्थ टळला.
असगोली खारवीवाडी येथील वहाळावरील बाजूस असलेल्या विजेच्या खांबावरून तब्बल १०० मीटर अंतरावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुसऱ्या मीटर खांबावरील ११ केव्हीची मुख्य वाहिनी अचानक तुटली. स्पार्किंगचा आवाज आल्याने आजूबाजूचे रहिवासी व दुकानदार घाबरून बाहेर आले व त्यांनी तुटून पडलेली विद्युत वाहिनी पाहिली.
यावेळी या १०० मीटर अंतरात रस्त्यावरून दुचाकी किंवा पादचारी जात नसल्याने अनर्थ टळला. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांची संपर्क साधला असता ही वाहिनी खूप जुनी असल्याने जीर्ण होऊन पडली ग्रामस्थांनी महावितरणला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी सहा कर्मचारी येऊन त्यांनी ही वाहिनी दुरुस्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 03/Jul/2025














