नाटे सागरी पोलीस ठाण्याचे संजय झगडे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती!

पाली : नाटे सागरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सागवे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाळकृष्ण झगडे यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते त्यांना स्टार लावून सन्मानित करण्यात आले.

संजय झगडे यांना मिळालेल्या या बढतीबद्दल नाटे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, नाटे सरपंच संदीप बांदकर, कात्रादेवी सागवे सरपंच सोनाली थुकरुल, व्यापारी संघटनेचे विद्याधर राणे, प्रकाश पारकर, रमेश लांजेकर, तसेच मच्छीमार संघटनेचे अमजद बोरकर आणि जुनेद मुल्ला यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

श्री. झगडे यांच्या या बढतीमुळे पोलीस दलातील त्यांचे योगदान आणि निष्ठा अधिकच उज्वल झाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 03-07-2025