मुंबई, [०३ जुलै, २०२५]: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER), आयुष, मुंबई यांच्यामार्फत तांत्रिक आणि गैर-तांत्रिक (टेक्निकल/नॉन-टेक्निकल) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा २०२५ घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण १,१५६ पदांची भरती केली जाणार असून, यात विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता:
अ) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय – एकूण १,१०७ पदे
- प्रयोगशाळा सहाय्यक (लॅबोरेटरी असिस्टंट) – १७० पदे:
- पात्रता: बीपीएमटी इन लॅॅबोरेटरी / बीएससी (पीएमटी) इन लॅबोरेटरी / बीएससी (फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी) सह लॅबोरेटरीमधील सर्टिफिकेट/डिप्लोमा. महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल ॲक्ट, २०११ अंतर्गत नोंदणी आवश्यक. (शासनमान्य हॉस्पिटलमधील १ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १८१ पदे:
- पात्रता: वरीलप्रमाणेच.
- ग्रंथपाल – ५ पदे:
- पात्रता: आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी (शक्यतो M.Sc. (बायोलॉजी किंवा झूऑलॉजी)) आणि लायब्ररी सायन्स पदवी.
- ग्रंथालय सहायक – १३ पदे:
- पात्रता: १० वी उत्तीर्ण आणि ६ महिन्यांचा लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स.
- सहायक ग्रंथपाल – १७ पदे:
- पात्रता: आर्ट्स, सायन्स, कॉमर्स पदवी (शक्यतो B.Sc. (बायोलॉजी किंवा झूऑलॉजी)) आणि ६ महिन्यांचा लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स.
- ई.सी.जी. तंत्रज्ञ – ८४ पदे:
- पात्रता: बीएससी (पीएमटी) इन कार्डिओलॉजी / बीएससी (फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी) सह कार्डिओलॉजी डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट. (१ वर्षाचा ईसीजी टेक्निशिअन अनुभव असल्यास प्राधान्य.)
- आहारतज्ज्ञ – १८ पदे:
- पात्रता: बीएससी (होम सायन्स).
- औषध निर्माता – २०७ पदे:
- पात्रता: १२ वी उत्तीर्ण, डी. फार्म. किंवा बी. फार्म. आणि फार्मसी अॅक्ट १९४८ अंतर्गत नोंदणी.
- प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार (Documentalist/Catalogner) – ३६ पदे:
- पात्रता: १० वी उत्तीर्ण आणि ६ महिन्यांचा लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स.
- समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) – १३५ पदे:
- पात्रता: M.S.W. (फिल्ड वर्कसह).
- क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) – ९४ पदे:
- पात्रता: B.P.M.T. in Radiography / B.Sc. (PMT in Radiography) / B.Sc. (Physics and Chemistry or Biology) सह रेडिओग्राफीमधील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट. (१ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
- क्ष-किरण सहायक (X-ray Assistant) – ३५ पदे:
- पात्रता: वरीलप्रमाणेच.
- भौतिकोपचार तज्ज्ञ – १७ पदे:
- पात्रता: १२ वी उत्तीर्ण, फिजिओ थेरपीमधील पदवी आणि ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपी ॲक्ट अंतर्गत नोंदणी.
- दंत तंत्रज्ञ – ९ पदे:
- वाहन चालक – ३७ पदे:
- पात्रता: १० वी उत्तीर्ण, LMV/MPMV/HMV/HPMV ड्रायव्हिंग लायसन्स, हिंदी-मराठी बोलता येणे, संबंधित क्षेत्रांची topography ज्ञान आणि मोटर दुरुस्तीचे ज्ञान.
क) अतांत्रिक संवर्ग (मुंबई बाहेरील पदे) – ४९ पदे
- उच्च श्रेणी लघुलेखक – १२ पदे:
- पात्रता: १० वी उत्तीर्ण, शॉर्ट हँड स्पीड १२० श.प्र.मि., टायपिंग इंग्लिश ४० श.प्र.मि. किंवा मराठी ३० श.प्र.मि.
- निम्न श्रेणी लघुलेखक – ३७ पदे:
- पात्रता: शॉर्ट हँड स्पीड १०० श.प्र.मि., टायपिंग इंग्लिश ४० श.प्र.मि. किंवा मराठी ३० श.प्र.मि.
महत्त्वाचे मुद्दे:
- डोमिसाईल: उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे (डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागेल).
- वयोमर्यादा (९ जुलै २०२५ रोजी):
- खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आदुघ: ४३ वर्षे
- अपंग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त: ४५ वर्षे
- पदवीधर अंशकालीन: ५५ वर्षे
- निवड पद्धत: ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची परीक्षा.
- परीक्षेचे माध्यम: मराठी आणि इंग्रजी.
- परीक्षेचे स्वरूप (अतांत्रिक पदे):
- व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे (वाहन चालक/लघुलेखक): मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, लॉजिकल ॲबिलिटी (प्रत्येकी १५ प्रश्न), एकूण ६० प्रश्न, ६० मिनिटे.
- व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली उर्वरित १४ पदे: मराठी, इंग्रजी (प्रत्येकी १५ प्रश्न), सामान्य ज्ञान/लॉजिकल ॲबिलिटी (३० प्रश्न), तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान (४० प्रश्न), एकूण १०० प्रश्न, ९० मिनिटे.
- गुणदान: प्रत्येक बरोबर उत्तरासाठी २ गुण. पात्रतेसाठी किमान ४५% गुण आवश्यक.
- परीक्षा केंद्र: उमेदवारांना ऑनलाइन अर्जात ३ परीक्षा केंद्रांचा पसंतीक्रम द्यावा लागेल.
- अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, इतर – रु. ९००/-.
- अर्जाची पद्धत: उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात. अर्जासोबत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक.
अंतिम मुदत:
या भरतीविषयी विस्तृत माहिती http://www.med-edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज याच संकेतस्थळावर ९ जुलै २०२५ पर्यंत करता येतील. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













