रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील श्री अरुआप्पा जोशी मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य उभे राहिले आहे. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण रत्नागिरीच्या वतीने उपमुख्याधिकारी यांना सोमवारी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सात दिवसांत रस्त्याच्या डागडुजीबद्दल निर्णय नाही घेण्यात आला, तर अभाविपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी त्रस्त होत आहेत. खड्ड्यातील चिखलाचे पाणी विद्यार्थ्यांच्या कपड्यावर उडते. रस्ता चिखलाने व्यापला आहे. हा रस्ता रत्नागिरी नगरपालिका हद्दीत येत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 03/Jul/2025














