रत्नागिरी : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अंशकालीन महिला परिचरांनी १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सलग तिस-या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. यामुळे आरोग्याच्या कामकाजावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ३५० महिला परिचर सहभागी झाल्या आहेत.
गेले ५ वर्षे जिल्हा परिषदेच्या अंशकालीन महिला परिचर या आंदोलन करत आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. अखेर १ जुलैपासून त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून या महिलांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी हे कामबंद आंदोलन सुरुच होते. जिल्ह्यात ३५० महिला परिचर आहेत. या सर्व महिला प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात काम करत आहेत. यामुळे आरोग्य सेवेच्या कामकाजावर थोड्याफार प्रमाणात परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.
अंशकालीन या नावात बदल करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला परिचरांमधून थेट घेण्यात यावे, वेतन २१ हजार देण्यात यावे, आदी या अंशकालीन परिचरांच्या मागण्या आहेत.
गेले अनेक वर्षे आम्ही आमच्या न्याय मागण्यांसाठी झगडत आहोत. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्येकवेळी आंदोलन केल्यानंतर तोंडी आश्वासन दिले जाते. आता मात्र जोपर्यंत लेखी काही मिळत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन मागे घेणार नाही- आकांक्षा कांबळे, अंशकालीन महिला परिचर अध्यक्षा, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 04/Jul/2025














