लांजा वनविभागाच्या ताब्यातील ‘तो’ बिबट्याचा बछडा संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये

लांजा : गेले ३९ दिवस वनविभागाच्या ताब्यात असलेल्या बिबट्याच्या बछड्यास बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथील प्राणिसंग्रहालयात सोडण्यात आल्याची माहिती लांजाचे वनपाल सारिक फकीर यांनी दिली.

बिबट्याच्या बछड्याची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात आला; परंतु बछड्याची आणि बिबट्या मादीची भेट झाली नसल्याने अखेर बछड्यास प्राणिसंग्रहालयात सोडण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे बछड्यास अखेर ३५ दिवसानंतर प्राणिसंग्रहालयात दाखल करण्यात आले. पुनस संसारे तिठा येथे ८ जूनला रात्रीच्या सुमारास बछडा आढळून आला. बछडा एक महिन्याचे असून नर आहे. बछड्याचे वजन ९५० ग्रॅम होते. पिल्लू २४ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 04/Jul/2025